आज तीच लग्न होत


                                                    


       आज तीच लग्न होत... लग्नाला जाव कि नाही याचा तो विचार करत होता. शेवटी त्यांनी जायचं ठरवलं. तुटलेलं मन आणि मनात काही जुन्या आठवणी घेऊन तो गेला. लग्नाच्या हॉल मधे पोचताच त्याला त्याचे जुने मित्र आणि मैत्रिणी दिसले. सिम्पतीच्या नजरेन ते सर्व त्याच्या कडे पाहत होते.  त्यांच्या कडे न जाता त्यान सरळ स्टेज कडे आपली आपली पावलं वळवली…. नात तोडण्याची वेळ आली होती आता. ती दोघ एकमेकांना कशी रीअॅक्ट होतात याकडे सर्वानच लक्ष्य लागल होत.  तिला तो दुरूनच दिसला, दोघांनि एकमेकांकडे पाहिलं. नजरेच्या भिंत्ती आज पडणार होत्या. आज ती आधी पेक्षा पण सुंदर दिसत होती. जणू नक्षत्रच. 4-5 वर्षाचं त्याचं जे नात होत त्याची फिल्म दोन क्षणात त्याच्या डोळ्या समोरून निघून गेली.
                                                                                                              तो स्टेज वर पोचला, चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन त्त्यानी दोघांचे हात हातात ठेवले आणि दोघांना लग्ना साठी शुभेछा दिल्या. तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट त्यान तिच्या हातात ठेवलं आणि इतर कुणाशीही न बोलता तो निघून गेला....



   घरी जाऊन रडला... रात्रभर रडला, मन भरून रडला, अश्रू संपेपर्यंत रडला. काही रुसलेले क्षण, काही तुटलेली नाती प्रत्येक पावलावर काचेसारख्या जखमा देतात. . त्या क्षणी त्याच्या आयुष्यात सारच संपल होत. पुढे काय कराव त्याला सुचत नवत.  ती आता आपल्या सोबत नाही, हे स्वीकारायला त्याला बराच वेळ लागला. कधी कधी त्याच्याच भावना त्याला कमजोर करायच्या. आता तो एकटा पडलाय हे जरी तो कोणाला सांगत नसला तरी ते त्याच्या डोळ्यात दिसायचं. ....

 मधे काही दिवस निघून गेले. आता त्यांनी एका नविन प्रवासाची सुरवात केली होती. हळू हळू तो स्व:ताला सावरत होता. काही जुने चेहरे विसरण्याचा प्रयत्न करत होता..  कमी बोलायचा आता,  ती भेटली नाही याचा रीग्रेट तो आता मनात ठेवत नाही..... बराच पुढे निघून गेलाय आता तो.

आता स्व:ता कडे लक्ष्य देतो... घरच्यान ची काळजी घेतो. आई ला घरात मदत करतो. बाबांना रुटीन चेकप साठी नियमित डॉक्टर कडे घेऊन जातो.... पण त्याला मात्र आजही तिची आठवण येते.  तिच्या आठवणी त्याच्या मनात आजही गडद आहे. आता तो रडत नाही पण दोन अश्रू पापण्याच्या काठावर येऊन थांबतात....                            




Comments