ब्लॅक
शर्ट
Black shirt suits you,घेनातू छान दिसेल तुला. सई राम ला म्हणाली. बऱ्याच दिवसांनी ते दोघ आज भेटले होते. ते दोघ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड
नवते. त्याचं नात म्हणजे more than friendship less than
relationship अस होत. राम चा स्वभाव तसा शांत, कमी बोलणारा. हसण्या आधी दहा दा विचार करणारा. त्याला
त्याच्या बॉनड्रीज माहित होत्या पण तो नम्र नवता.. सई पण
साधारण तशीच, थोडी हसरी थोडी नाजूक थोडी तिखट. पण दिसायची मात्र गोड ती. एक क्युटनेस ती तिच्या सोबत नेहमी कॅरी करायची.
दोघानच बोलन आधी पेक्षा आता वाढल होत. तिचा मॅसेज येताच त्याचा दोन हजाराचा मोबाईल त्याला वीस हजाराचा वाटत होता. दोघ आता जवळ येऊ लागले होते.
दोघांमध्ये एक कम्फर्ट झोन तयार झाला होता. रामला सई आवडायला लागली होती. सई पण राम वर हक्क गाजवायला लागली होती. ‘असा
राहत जा’, ‘असा
नको’. हे शर्ट घाल हे नको. आणि तीच हे अस वाघन, हक्क
गाजवण रामलाही आवडत होत.
पन या मधल्या काळात त्यांच्या नात्यात बरीच वळण आली होती. आता
ते पहिले सारख राहील नवत, गुंता झाला होता आता. दोघान मधल बोलन सुद्धा आता थोड कमीच
झाल होत. आता दोघांची चीड चीड व्हायची, वादही
व्हायचे. नात्यांच्या ज्या घड्या घट्ट बसल्या होत्या त्या आता
उकल्ल्या गेल्या होत्या. कधी कधी चाकू, बंदूक, सुरी यांची भीती नाही वाटत, शब्द पुरेसे असतात सोलून काढायला. उसवलेल त्यांचं नात राम शिवण्याचा प्रयत्न करत होत.
त्याचा आनंद नेहमीच तिच्या वाघन्यावर अवलंबून असायचा.
रामच्या मनात बऱ्याच गोष्टी टोचायच्या
पण बोलून तो सई ला कधीच दुखवायचानाही. आता तो शब्दात व्यक्त होण
टाळायचा. आणि ती नेहमी शब्दातच अडकायची,
नजरेची भाषा तिला कधी कळलीच नाही. खूप गोष्टी बोल्या नाही जात
त्या मनातच राहतात. त्याला माहित होत जर तो शब्दात व्यक्त झाल तर त्याचा
स्वतावरचा ताबा सुटेल आणि इतक्या दिवसच जे मनात खद खदत होत ते सार तो बोलून बसेल. म्हणून तो चूप राहायचा. कारण त्याला तिच्या अश्रूनच
कारण नवत व्हायचं. आणि जीव अडकला कि तडजोडी करावयाच
लागतात हे ही त्याला चांगलच माहित होत. काही गोष्टी आयुष्यात
नॉन नेगोशीएबल असतात.
ती बोलायला नाही या पेक्षा आपल बोलन तिच्या पर्यंत पोचत नाहीये याच दुख
त्याला जास्त व्हायचं. जिच्या असण्याला अर्थ होत ती नसल्याची
पोकळी जास्त होती त्याच्या मनात. खर तर प्रश्न कधी शर्टाचा
नावताच. प्रश्न होता भावनान चा, एकमेकांना
समजून घेण्याचा. पण न सुटणारे प्रश्न ती रामच्या वाट्याला सोडून निघून गेली..
रामला मात्र आजही प्रश्न पडतो नक्की
काय नात होत त्यांच्यात. विचाराव का तिला कि राहू द्याव या
प्रश्नाच उत्तर तसच अनुतंरीत? स्वता पाशीच मनात कुठेतरी खोल.
खरतर दोघं आता सेम पेज वरती नाहित. सई आता बरीच पुढे निघून गेली. आणि
रामनीही आता चालायला सुरवात केली आहे. तो सुद्धा आता बराच पुढे
निघून गेलाय….
Comments
Post a Comment