हरवलेल्या वाटा



                                   हरवलेल्या वाटा 
 


                                                                                15 – 16 वर्षाच वय आणि कॉलेजचा पहिला दिवस, समोर दिसणारे सर्व नविन चेहरे. पहिल्या दिवशी जाणवणारा एकटेपणा नंतर कधी जाणवलाच नाहीं. हळूहळू काही जण एकमेकांच्या जवळ येऊ लागले. क्लास मधे कमी आणि कॅन्टीन मधे जास्त वेळ जाऊ लागला. कधी क्रिकेट कधी राजकारण तर कधी क्लास मधल्या मुली  यासारख्या विषयावर गप्पा रंगू लागल्या. टाळी साठी एकमेकांचे हात पुढे येऊ लागले. हळू हळू ग्रुप मधे मुली सुद्धा जुळत गेल्या. असे किती तरी रंगाचे तुकडे मिळून एक ग्रुप तयार झाला......
लवकरच सर्वजण एकमेकान सोबत ‌अॅड़जस्ट झाले. मुलगा मुलगी असा भेद नाही राहिला. सर्वांची मैत्री आकार घेऊ लागली. कॉलर मागे फेकून बाह्या वर चढउन  मित्रांन सोबत राहतान धमकही आली आणि धाडसही वाढल. जसे जसे दिवस सरत गेले तशी तशी सर्वांची व्यक्तिमत्व अधिक फुलत गेली. इतर नात्या पेक्षा हे नात जरा जवळच वाटू लागल. प्रत्येकाची वेगळी एक अशी हक्काची जागा निर्माण झाली. कधी गंभीर तर कधी पोटदुखे पर्यंत हसवणाऱ्या गोष्टीत तास अन् तास कसा निघून जायचा पत्ताच लागायचा नाही.
                  परिक्षा जवळ आली की अभ्यासाच्या प्लानिंग पेक्षा परिक्षा संपल्यावर फिरायला कुठे जायच याचं प्लानिंग आधी होत होत.  मित्रांन सोबत मिळून मिळून रात्र जागून पूर्ण केलेले  असाइनमेंट  असो  किंवा परीक्षेच्या आधी मैत्रिणीने  केलेली मदत असो. ही त्यांनी केलेली मदतच होती जी  आयुष्य भराची शिकवण देऊन गेली. कदाचित यालाच आपली मैत्री पूर्णत्वास नेण अस म्हणतात. कधी कधी शब्दा पेक्षा त्या मागच्या भावना महत्वाच्या असतात. एकमेकांवर असणारा अपार विश्वास, कितीही काही झाल तरी आपला मित्र आपल्याला धोका देणार नाही हा विश्वास. कदाचित या सर्व गोष्टींमुळे मैत्री अधिक घट्ट होत गेली.
                                   वाढदिवसाच्या पार्टीत बेधुंद्द होऊन नाचलो सुद्धा, आणि मित्रांच्या दुःखात सहभागी होऊन रडलो सुद्धा. कधी वादही घातले तर कधी दोघात झालेली भांडणं सोडवली सुद्धा. सुखही सोबतच पाहिलं आणि दुःखं ही सोबतच भोगाल आम्ही. अश्या अनेक गोष्टी ज्या आम्ही सोबत जगलो. ती मजा काही वेगळीच होती. जणू जग आपल्या मुठीत आहे. पण नुसता आनंदच नव्हता त्या दिवसात. कष्टही होते, एन्जोयमेंट च्या मागे असणारी अभ्यासाची मेहनतही होतीच. याच काळात प्रत्येक गोष्टीचे अनुभव सुद्धा यायला  लागले. चांगल्या वाईट लोकांपासून बरच काही शिकायला मिळाल. कोणी विचार केला होता कि, याच वयात मिळणाऱ्या अनुभवानवर आपण आपल्या उद्याच्या आयुष्याची पहिली पायरी रचू .
                                         पण आता सार चित्रंच पालटलय. कॉलेजचे ते दिवस संपलेत आता. करियर आणि फ्युचर च्या नादात सर्वजण नकळत एकमेकांन पासून दुरावले. सर्व पाखरं आपल्या स्वप्नांच्या  च्या मागे धावण्यासाठी आपआपल्या रस्त्यानं निघून गेली. माणसं तर चालली  गेली पण त्यांच्या आठवणी मात्र तश्याच कायम राहिल्या. खरं तर मन भूतकाळात जायला पटकन तयार होत नाही. पण अश्या अनेक आठवणी आजही मनात येतात. पण काही तरी रुत्तत मनात. कधी कधी आठवणीचा आधार पुरेसा नसतो. आता तर स्वछ हसता सुद्धा येत नाही. एकटेपणा दिसतो एकमेकांनच्या डोळ्यात. अस वाटं जिथून सुरवात केली त्या पेक्षा पण मागे आलोय. कॉलेज संपल्यावर आम्ही सर्वच जण  काही ना काही तरी हरलो होतो. हात पकडायची सवय नसती तर हात सुटायची भीती पण नसती. आयुष्याच्या बिझी शेडूल  मधे जीवभावाचे मित्र हरवलेत कुठे तरी. कॉलेज सुटल्यावर संध्याकाळच्या त्या मंद प्रकाशातल्या सावल्या आजही डोळ्यात तश्याच आहेत. खरं तर आज कळतयं  त्या दिवसांची खरी किंमत, काय कमावलं आणि काय गमावलं.
                                                          कधी त्रास कधी वैताग  तर कधी मनस्तापही झाला. पण नांती तुटली नही, कारण नाती ही जपायची असतात. आणि सर्वांनी अगदी विश्वासानं ती जपली सुद्धा. कॉलेज मधे भेटलेले मित्र, मैत्रिणी, झालेली भांडण, सेलिब्रेट केलेले वाढदिवस. अश्या अनेक आठवणी अंतकरनावर कोरल्या गेल्या. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवत, खंर तर भरपूर काही  दिल या नात्यांनी, आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिला, नविन रंग भरले आयुष्यात. कायम मनाजवळ राहतील अशी माणसं दिली. कॉलेज म्हणजे एक दुसरी दुनियाच होती आमच्यासाठी. आयुष्यातले सोनेरी  दिवस होते ते. ज्याच्या प्रकाशावर मी आजही जगतोय. पण आता ते दिवस संपलेत. राहिल्या त्या फक्त आठवणी आणि जबाबदाऱ्या.....................


Comments

  1. Khup chan.. Sarvana aplya "harawlelya wata" milwun denar article... :)

    ReplyDelete
  2. Khup bhari lihilas pratyek vakyat jiv otlas tu .. pratyek vakya khup bhari!!

    ReplyDelete
  3. Khup bhari lihilas pratyek vakyat jiv otlas tu .. pratyek vakya khup bhari!!

    ReplyDelete
  4. Very Nice line....Ashich maitri rahu de..forever

    ReplyDelete
  5. Very Nice line....Ashich maitri rahu de..forever

    ReplyDelete
  6. रुसलेल्या वळनांची वाट विसरुन,नवीन वळनांच्या वाटेचा आधार घेवून चालताना कधितरी मागे वळून पाहव, नक्कीच नवीन जगण्याची उम्मेद होते.

    ReplyDelete
  7. Reading your blog with full of good words give me happiness and fine feeling ������

    ReplyDelete

Post a Comment